Fri. Sep 24th, 2021

‘या’ रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे रखडल्या 30 ते 40 शस्त्रक्रिया

महापालिकेच्या सायन रुग्णालयात सोमवारी युरोलॉजी आणि जनरल अशा मिळून तब्बल 3० ते 4० शस्त्रक्रिया रखडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

धुतलेले कपडे न मिळाल्याने या रुग्णालयातील शस्त्रक्रिया रखडल्याची धक्कायक माहिती समोर आली आहे.

सायन रुग्णालयातील 50 टक्के कपडे खासगी लाँड्रीमध्ये आणि 50 टक्के कपडे सेंट्रल लाँड्रीमध्ये धुवायला जायचे.

मात्र रूग्णालय प्रशासनाने महापालिकेच्या प्रभादेवीतील सेंट्रल लाँड्रीच्या कंत्राटदारांचे 90 कोटी थकवल्याने हे कपडे धुतले नसल्याची माहिती समोर येत आहे.

या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सायन रूग्णालयात घडला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *