Wed. Aug 10th, 2022

मुंबई आणि ठाण्यात 20 दिवस पुरेल इतकच पाणी शिल्लक

मुंबई आणि ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीसाठ्यामध्ये अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. हे पाणी फक्त पुढील 20 दिवस पुरेल असं सांगण्यात येत आहे. यामुळे पाणीकपात केली जात आहे.

अवघा महाराष्ट्र पाण्यासाठी मान्सूनची वाट बघत आहे. तर आता मुंबई आणि ठाण्याला ही मान्सूनची वाट पहावी लागणार आहे. मुंबई आणि ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीसाठ्यामध्ये अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. हे पाणी फक्त पुढील 20 दिवस पुरेल असं सांगण्यात येत आहे. यामुळे पाणीकपात केली जात आहे. त्यामुळे पावसाचे आगमन न झाल्यास पाणीसंकट जास्तच तीव्र होण्याची भीती व्यक्त होत आहे. मुंबईसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांनीही तळ गाठला आहे.

मुंबई आणि ठाण्यावर पाणीसंकट

मुंबईकरांना उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी, भातसा आणि मध्य वैतरणामधून पाणी पुरवठा केला जातो.

3,650 दशलक्ष लिटर पाणी जलशुद्धीकरणसाठी आणले जाते त्यातून 3.515 दशलक्ष लिटर पाणी मुंबईकरांना दिले जाते.

या सातही तलावांमध्ये सुमारे 73 हजार 784 दशलक्ष लिटर पाणी साठा शिल्लक आहे.

मागील वर्षी याच दिवसात 2 लाख 53 हजार 043 दशलक्ष लिटर पाणी तलावात शिल्लक होते.

पावसाने अजून हजेरी न लावल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.

ठाण्यासाठी महत्वाचे असलेल्या बारवी आणि भातसा या दोन्ही धरणांमध्ये फक्त 14 टक्के साठा शिल्लक आहे.

यामुळे आठवडय़ातून एक दिवस शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.