Fri. Sep 20th, 2019

मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये मुसळधार; वाहतूक ठप्प

0Shares

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उगनगरात मुसळधार पाऊस पडत असून आज संपूर्ण मुंबईत मुसळधार पाऊस पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आज सकाळी 8 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद अंधेरी पूर्व विभाग कार्यक्षेत्रात झाली आहे. या परिसरात २१४.३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सर्वाधिक पावसाची नोंद –

सकाळी 8 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत परिसरात २१४.३५ पावसाची नोंद अंधेरी पूर्व विभाग कार्यक्षेत्रात झाली आहे.

शहर भागात सर्वाधिक पाऊस दादर परिसरात झाला असून 168.15 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

वडाळा परिसरात 158.97 मिलिमीटर तर धारावी परिसरात 148.58 पावसाची नोंद झाली आहे.

रावळी कॅम्प परिसरात 139.2 असून हिंदमाता परिसराचा समावेश असलेल्या एफ दक्षिण विभागात 113.78 मिलिमीटर पाऊस पडला आहे.

मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे याच कालावधीत एकूण 69.35 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

विक्रोळी परिसरात 184.17 मिलिमीटर  असून कुर्ला परिसरात 147.84 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

घाटकोपर परिसराचा समावेश असलेल्या एन विभागामध्ये 124.95 मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *