Jaimaharashtra news

‘मेट्रो २ ए’ आणि ‘मेट्रो ७’ ची चाचणी मेअखेरीस

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून उभारण्यात येणाऱ्या मेट्रोच्या २ ए आणि ७ या मार्गिकेची बहुप्रतिक्षीत चाचणी मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात घेतली जाणार आहे. ‘एमएमआरडीए’ने त्याची तयारी केली असून आरे ते कामराज नगर या २० किलोमीटर दरम्यानच्या मार्गावर ही चाचणी घेण्यात येणार आहे.

मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ या मार्गिकेवर जानेवारी महिन्यात चाचणी घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. तर एप्रिल महिन्यात मेट्रो सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र टाळेबंदीमुळे मजूर गावी गेल्याने हा प्रकल्प रखडला होता. तसेच मेट्रो गाडीच्या बांधणीमध्ये महत्त्वपूर्ण असलेला एक घटक जपानमधून आयात करण्यास विलंब झाला. त्यामुळे मेट्रोची बांधणी रखडली होती. सध्या मुंबईत सहा डब्यांची एक मेट्रो ट्रेन दाखल झाली आहे. ही नमूना ट्रेन चारकोप स्थानकात चाचणीसाठी तयार ठेवण्यात आली आहे. उर्वरित भागातील काही कामे अद्याप अपूर्ण असून ती पूर्ण होताच एमएमआरडीएकडून पुढील मार्गावरही चाचणी घेतली जाणार आहे.

Exit mobile version