मुंबईत बुधवारी लसीकरण बंद

मुंबई: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरणावर जोर दिला जात आहे. मुंबईत वेगानं लसीकरण सुरू असल्याचं दिसत असून, लसटंचाईमुळे लसीकरणात खोळंबाही निर्माण होताना दिसत आहे. त्यातच आता मुंबईत बुधवारी लसीकरण बंद असणार आहे. महापालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केलं जाणार नसल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे.
लसीकरण कार्यक्रमाच्या सुरूवातीला केंद्राने विशिष्ट वयोगटातील नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची जबाबदारी घेतली होती. यामुळे राज्ये आणि महानगरांमध्ये लस खरेदीसाठी स्पर्धा सुरू झाली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर केंद्रानं १८ वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणाची जबाबदारी स्वीकारली. मात्र, लसटंचाईचा प्रश्न कायम आहे.
मुंबईत बुधवारी लसीकरण बंद असणार आहे. महापालिकेनं याची माहिती दिली आहे. “मुंबईकरांनो, आम्ही सूचित करू इच्छितो की बुधवारी बृहन्मुंबई महानगरपालिका व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केले जाणार नाही. आपल्याला होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. लसीकरण केंद्र व वेळापत्रकाविषयीच्या पुढील सूचना आम्ही देत राहू”, असं महापालिकेनं म्हटलं आहे.
मुंबईकरांनो,
आम्ही सूचित करू इच्छितो की उद्या (४ ऑगस्ट २०२१) बृहन्मुंबई महानगरपालिका व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केले जाणार नाही.
आपल्याला होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
लसीकरण केंद्र व वेळापत्रकाविषयीच्या पुढील सूचना आम्ही देत राहू.#MyBMCvaccinationUpdate
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 3, 2021
महापालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर लसीकरण केलं जाणार नसलं, तरी खासगी रुग्णालयातील लसीकरणाबद्दल महापालिकेनं कोणतंही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयात नागरिकांचं लसीकरण सुरूच असणार आहे.