मुंबईमध्ये आजपासून तीन दिवस लसीकरण बंद

देशात कोरोना कहर सुरूच आहे. यावर उपाय म्हणून अनेक नागरिक लस घेत आहे. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण होत आहे मात्र सध्या मुंबईमध्ये आजपासून तीन दिवस लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे लसीकरण केंद्राबाहेर आज शुकशुकाट बघायला मिळली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी लसीकरण होत आहे . साठा उपलब्ध नसल्यानं लसीकरण ३ दिवसासाठी बंद राहिलं असं मुंबईतही पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर सध्या लसीकरण सुरू असताना अनेक ठिकाणी लसींचा पुरवठा अपुरा पडत आहे. लस मिळत नसल्यानं नागरिक संतप्त झालेचं दिसून येत आहे. नागरिकांनी पालिकेच्या कारभारावरती नाराजी व्यक्त केली आहे.

Exit mobile version