Sun. Jun 20th, 2021

मुंबईला पाणी पुरवणाऱ्या धरणांमध्ये केवळ 25 टक्केच पाणीसाठा शिल्लक!

गेल्या तीन वर्षांच्या तुलनेमध्ये संपूर्ण मुंबईला पाणीसाठा पुरवणाऱ्या धरणांमध्ये या वर्षी सर्वांत कमी पाण्याचा साठा शिल्लक आहे. मुंबईसाठी सात धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. पण आता याच धरणांच्या पाण्याच्या पातळीमध्ये अतिप्रमाणात घट झाली आहे. यामध्ये सातही धरणांमध्ये सरासरी 25 टक्केच पाणी आता शिल्लक आहे. त्यामुळे पुढच्या पावसाळ्यापर्यंत पाणी जपूनच वापरावं लागणार आहे. एप्रिल महिन्यातील हा सर्वात नीच्चांक आहे.

कमी पावसाचा परिणाम

भातसा, तानसा, तुलसी, विहार, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा आणि मोडक सागर या सात धरणांमधून संपूर्ण मुंबईला पाणी पुरवठा केला जातो.

या सात धरणांमध्ये सरासरी 25 टक्के इतकाच पाणीसाठा आता शिल्लक असल्याचं सांगण्यात येत आहे.

तरीही या पाणीपातळीचा मुंबईच्या पाणी पुरवठ्यावर गंभीर परिणाम होणार नाही, असं महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतंय.

मात्र येत्या पावसाळ्यामध्ये कमी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज ‘स्कायमेट’ या खाजगी संस्थेने वर्तवला आहे.

त्यामुळे आगामी पावसाळ्याकडे लक्ष ठेवावं लागणार आहे.

गेल्या वर्षी याच एप्रिल महिन्यामध्ये एकूण 39 % पाणीसाठा उपलब्ध होता.

तोच पाणीसाठा यावर्षी 25 % वर उतरला आहे.

अप्पर वैतरणा आणि विहार धरणांमध्ये सरासरी 20 % पाणीसाठा आहे.

तुलसी धरणामध्ये 42 % तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणामध्ये 26% पाणीसाठा शिल्लक आहे.

पाणीटंचाईचं संकट!

महापालिकेकडून पुढील पावसाळ्यापर्यंत पाणीसाठा राखून ठेवला आहे.

काही भागांमध्ये गेल्या वर्षी जून आणि जुलै मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता.

परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण समाधानकारक नव्हते.

त्यामुळे पावसाच्या साठवणुकीमध्ये घट झाली आहे.

भातसा आणि अप्पर वैतरणा  धरणांमध्ये  जे पाणी राखीव ठेवण्यात आले आहे, त्याचा वापर कमतरता भासल्यास केला जाईल.

अप्पर वैतरणा हा महापालिकेचा पाणलोट क्षेत्र आहे.

भातसा धरण ठाणे, भिवंडी यासारख्या महापालिकांसोबत वाटून घेण्यात आलं आहे.

यासाठी भातसा धरणामधील पाणी वापरण्यासाठी राज्य सरकारची  परवानगी घेणं गरजेचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *