Wednesday, December 11, 2024 07:21:51 PM

मुंबईचीही हवा विषारी

मुंबईचीही हवा विषारी

दिल्लीपाठोपाठ मुंबईचीही हवा होत असल्‍याचे पाहायला मिळत आहे. याचा मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून प्रदूषणामुळे श्वसन आणि दम्याचे रुग्ण ३० ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपचार आणि औषधांच्या वापरात बदल केला जात असल्‍याचे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. विशेषत: जे लोक आधीच फुप्फुसाच्या आजाराने त्रस्त आहेत, त्यांच्या समस्या वाढल्या आहेत. प्रदूषणाच्या अच्छादनामध्ये गुरफटलेले हे शहर आता उच्च जोखीम गटात मोडणाऱ्या लोकांच्या आरोग्याच्या समस्यांमध्ये आणखी वाढ करत असल्‍याचे तज्‍ज्ञांनी सांगितले.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo