Tuesday, December 10, 2024 09:50:27 AM

बीकेसीत आता पॉड टॅक्सी धावणार

बीकेसीत आता पॉड टॅक्सी धावणार

मुंबई, ६ मार्च २०२४, प्रतिनिधी :  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत बीकेसीत भक्कम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी करण्यासाठी पॉड टॅक्सीचा विचार करण्यात आला आहे. वांद्रे- कुर्ला संकुलातील म्हणजेच बीकेसीतील कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी तसेच मुंबई नगरीत आंतरराष्ट्रीय सेवा सुविधांची उभारणी करण्याच्या दृष्टीने वांद्रे रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान पॉड टॅक्सीसेवा सुरू होणार आहे अशा प्रकारच्या अत्याधुनिक सेवेसाठी १०१६.३८ कोटी रूपये खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अर्थसंकल्पीय १५६ व्या बैठकीच मंजुरी दिली आहे.

पॉड टॅक्सी म्हणजे काय?

एक स्वयंचलित जलद गतीची सार्वजनिक वाहतूक परिवहन प्रकल्प म्हणजेच पॉड टॅक्सी होय. ही पॉड टॅक्सी वीजेवर चालणारे वाहन आहे आणि ते चालकविरहित वाहतुकीचं साधन आहे. या टॅक्सी छोट्या स्वयंचलित गाड्या आहेत.

पॉड टॅक्सीचे वैशिष्ट्ये काय?

पॉड टॅक्सी हे ४ ते ६ आसनी स्वयंचलित  वाहन आहे. साधारणपणे दोन प्रकारची वाहने असतात. एक दोरीच्या साहाय्याने तर दुसरी वायरच्या हवेत चालते. वाहन चालकाऐवजी चार्ज करण्यायोग्य बॅटरीवर चालते. हे वाहन शेअरिंग ऑटो म्हणून वापरले जाऊ शकते. एकाच वेळी पाच जण प्रवास करू शकतात. सरासरी गती प्रती तासाला ६० किमी इतकी आहे. इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी तुम्हाला टॅक्सीच्या टच स्क्रीनवर तुमचे स्थान टाईप करावे लागेल. ठराविक स्थानकावर गाडी थांबते आणि दार आपोआप उघडते. पॉड टॅक्सी रस्त्यावर चालत नसल्यामुळे प्रवासात प्रवाशांना लाल सिग्नल आणि वाहतुकीचा त्रास होणार नाही.   


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo