Thursday, November 13, 2025 01:03:58 PM

Chembur School Mehndi Controversy : शाळेत मेहंदीवरून वाद! विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश नाकारल्याने पालक संतप्त

शाळेतील सुमारे 10 ते 15 विद्यार्थ्यांना हातावर मेहंदी लावल्यामुळे वर्गात प्रवेश नाकारण्यात आल्याचा पालकांचा आरोप आहे.

chembur school mehndi controversy  शाळेत मेहंदीवरून वाद विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश नाकारल्याने पालक संतप्त

Chembur School Mehndi Controversy: चेंबूर येथील सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूलमध्ये एका वादग्रस्त घटनेमुळे गदारोळ उडाला आहे. शाळेतील सुमारे 10 ते 15 विद्यार्थ्यांना हातावर मेहंदी लावल्यामुळे वर्गात प्रवेश नाकारण्यात आल्याचा पालकांचा आरोप आहे. या घटनेनंतर संतप्त पालकांनी शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. पालकांच्या मते, गेल्या आठवड्यात विद्यार्थिनींना फक्त हातावर मेहंदी लावल्यामुळे वर्गाबाहेर थांबवण्यात आले.

हेही वाचा -  Mumbai Metro : मेट्रोचा प्रवास होणार अधिक सुखकर, प्रशासनाने घेतला महत्त्वाचा निर्णय

शिक्षण विभागाकडून शाळेला नोटीस 

या कृतीला पालकांनी भेदभावपूर्ण आणि अन्याय्य ठरवत संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र शिक्षण विभागाने शाळेला नोटीस बजावली असून, 4 डिसेंबरपर्यंत सविस्तर उत्तर मागवले आहे. दरम्यान, शाळा प्रशासनाने भेदभावाचे सर्व आरोप फेटाळले आहेत. 

हेही वाचा - Prakash Surve Controversial Statement : 'उत्तर भारतीय माझी मावशी, ती जगली पाहिजे'; 'मराठी आई मेली तरी चालेल...', म्हणणाऱ्या प्रकाश सुर्वेंवर होतेयं टीका

शिक्षण विभागाकडून चौकशी सुरू 

तथापी, शाळा प्रशासनाचे म्हणणे आहे की, विद्यार्थ्यांना केवळ शिस्तीचे नियम पाळण्याची सूचना करण्यात आली होती आणि कोणत्याही विद्यार्थ्याशी अन्याय्य वर्तन झालेले नाही.  दरम्यान, शिक्षण विभागाने या घटनेची चौकशी सुरू केली असून, शाळेकडून तपशीलवार अहवाल मागवण्यात आला आहे. 
 


सम्बन्धित सामग्री