Dahisar-Mira-Bhayander Metro: मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. दहिसर ते काशीगाव दरम्यानच्या 'मेट्रो लाइन 9' च्या चाचणी फेऱ्या यशस्वीपणे पार पडल्या असून, हा मार्ग आता कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या 7 वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पाचा पहिला टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
वाहतूक कोंडीतून मुक्तता
या मेट्रोमुळे उत्तर मुंबई आणि मीरा-भाईंदर परिसरातील दळणवळण पूर्णपणे बदलणार आहे. मुख्य म्हणजे, दहिसर स्थानकावरून ही मेट्रो थेट मेट्रो लाइन 7 (दहिसर ते गुंडवली) ला जोडली जाणार असल्याने पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होईल.
वेळेची मोठी बचत
सध्या या मार्गावर लागणारा 1 ते 1.15 तासांचा प्रवास आता केवळ 25 ते 30 मिनिटांत शक्य होणार आहे. हा दहिसर ते काशीगाव टप्पा साधारण 5 किमीचा असून, या संपूर्ण 13.5 किमीच्या मार्गिकेत 8 स्थानके आहेत. मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांनी (CMRS) दिलेल्या काही तांत्रिक सुधारणांचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे.
हेही वाचा - Mumbai Vijaydurg RO-RO Service: कोकणवारी झाली अधिक सुस्साट; भाऊच्या धक्क्यावरून सुटली पहिली रो-रो बोट; 390 प्रवाशांसह विजयदुर्ग बंदरात दाखल
मेट्रो जाळ्याचा विस्तार
मेट्रो लाइन 9 सह, मुंबईत लवकरच मेट्रो लाइन 2B मार्गिका देखील सुरू होणार आहे. 2026 मध्ये डीएन नगर ते मंडाले (मान्खुर्द) दरम्यान 23.6 किमी लांबीची ही नवीन मेट्रो धावणार असून, यात 20 स्थानके असतील. या मार्गिकेमुळे अंधेरी, वांद्रे-कुर्ला संकुल (BKC), चेंबूर आणि मान्खुर्द यांसारख्या महत्त्वाच्या भागांत प्रवाशांना सहजपणे प्रवास करता येईल.