Saturday, June 06, 2026 10:53:38 AM

Adani Group New Project: सर्वात श्रीमंत व्यक्ती बनल्यानंतर अदानींची मोठी घोषणा; मुंबईत सुरू करणार 1,00,000 कोटींचा मेगा प्रोजेक्ट

गोरेगाव (पश्चिम) येथील 143 एकरवर पसरलेल्या 'मोतीलाल नगर'च्या पुनर्विकासाची जबाबदारी आता अदानी समूहाकडे सोपवण्यात आली आहे.

adani group new project सर्वात श्रीमंत व्यक्ती बनल्यानंतर अदानींची मोठी घोषणा मुंबईत सुरू करणार 100000 कोटींचा मेगा प्रोजेक्ट

Adani Group New Project:  आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मिळवल्यानंतर गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील 'अदानी समूहा'ने मुंबईच्या विकासासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. गोरेगाव (पश्चिम) येथील 143 एकरवर पसरलेल्या 'मोतीलाल नगर'च्या पुनर्विकासाची जबाबदारी आता अदानी समूहाकडे सोपवण्यात आली आहे. 'महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने' (MHADA) तयार केलेल्या आराखड्यानुसार, या महाप्रकल्पात 1 लाख कोटींहून अधिक गुंतवणूक होणार आहे. मुंबईतील आजवरच्या सर्वात मोठ्या पुनर्विकास प्रकल्पांपैकी एक म्हणून याकडे पाहिले जात आहे.

अदानी रिअल्टीची निविदा प्रक्रियेत बाजी
मोतीलाल नगर पुनर्विकासासाठी राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत 'अदानी रिअल्टी' यशस्वी बोलीदार म्हणून समोर आली आहे. हा प्रकल्प 'बांधकाम आणि विकास संस्था' या कार्यपद्धतीनुसार राबवला जाणार असून, यात रहिवाशांचे पुनर्वसन आणि खुल्या विक्रीसाठीचे (Free-sale) घटक अशा दोन्ही बाबींचा समावेश असेल. या प्रकल्पामुळे गोरेगाव परिसराचा कायापालट होणार असून आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.

हजारो रहिवाशांचे होणार पुनर्वसन
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी म्हाडाने सविस्तर नियोजन केले आहे. आराखड्यानुसार, 3,702 पात्र रहिवाशांना प्रत्येकी 1,600 चौरस फूट कार्पेट एरिया असलेली मोफत घरे दिली जातील. 328 व्यावसायिक गाळ्यांना अंदाजे 987 चौरस फूट जागा उपलब्ध करून दिली जाईल. सुमारे 1,600 झोपडपट्टीवासीयांचे 300 चौरस फूट कार्पेट एरिया असलेल्या घरांमध्ये पुनर्वसन केले जाईल. या प्रक्रियेतून म्हाडालाही घरांचा मोठा साठा उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे मुंबईतील गृहनिर्माण समस्या सोडवण्यास मदत होईल.

हेही वाचा - Maharashtra Heat Wave SOP: उन्हाच्या तडाख्यामुळे सरकारने बदलली कामाची वेळ; तुमच्या कामाचे वेळापत्रक काय आहे पाहा?

पुनर्वसनाचे काम 7 वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या माहितीनुसार, या प्रकल्पातील एकूण गुंतवणूक ₹1 लाख कोटींच्या घरात जाईल. पुनर्वसनाशी संबंधित सर्व कामे पुढील 7 वर्षांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. दरम्यान, 'ब्लूमबर्ग बिलिनियर्स इंडेक्स'नुसार गौतम अदानी 92.6 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह मुकेश अंबानी यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. श्रीमंतीच्या या शिखरावर असतानाच त्यांनी मुंबईसाठी हा नशीब बदलणारा निर्णय घेतला आहे.


सम्बन्धित सामग्री