जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई : १८ जुलै रोजी संध्याकाळी गोवा राज्य लॉटरीद्वारे "राजश्री २० गुरु साप्ताहिक लॉटरी" ची सोडत काढण्यात आली. ज्यामध्ये मुंबईतील दादर परिसरात असलेल्या "कार्तिक लॉटरी" नावाच्या लॉटरी आउटलेटच्या ग्राहकाने प्रथम पारितोषिक जिंकले आहे. ७ लाख रुपयांचे विजेता ग्राहक अद्याप अज्ञात आहेत परंतु, आउटलेटचे मालक श्री. विजय ढोबळे विजेत्याची माहिती मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. विजयाच्या वृत्ताने ढोबळे खूप खूश झाले आहेत आणि ही बातमी समोर आल्यापासून विजेत्या ग्राहकाविषयी आजूबाजूच्या लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. हा लखपती नेमका कोण आहे ?, हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत.
दररोज आयोजित करण्यात येणाऱ्या या लॉटरीत पहिल्या बक्षिसासह इतर अनेक आकर्षक बक्षिसांचा समावेश आहे, जी जिंकून खेळाडू त्यांची स्वप्ने साकार करू शकतात. राजश्री लॉटरी हे भारतीय लॉटरी जगतात केवळ एक प्रसिद्ध नाव नाही तर लॉटरी खेळाडूंचा सर्वाधिक पसंतीचा लॉटरी ब्रँड आहे. त्यामुळे, महाराष्ट्रातील प्रत्येक भागातील लोक या लॉटरीत सहभागी होतात. राजश्री लॉटरीने आतापर्यंत अनेक बक्षिसे जिंकवून देऊन अनेक खेळाडूंचे नशीब पालटले आहे.