Railway Megablock: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही शनिवारी रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुमची गैरसोय होऊ शकते. कारण भायखळा रेल्वे स्थानकावर फुट ओव्हर ब्रिज गर्डर्स बसवण्यासाठी आणि शीव (सायन) स्थानकावर सार्वजनिक पादचारी पूलाचे फूट ओव्हर ब्रिज गर्डर्स बसवण्यासाठी दोन विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स घेण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेवरील भायखळा स्थानकावर फुट ओव्हर ब्रिजचे चार स्टील गर्डर्स बसवण्यासाठी 110MT रोड क्रेन वापरुन शीव रेल्वे ओव्हर ब्रिज येथे सार्वजनिक फुट ओव्हर ब्रिज चा 40 मीटर स्पॅन बसवण्यासाठी 250T रोड क्रेन वापरून दोन विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स घेण्यात येत आहेत. 27 सप्टेंबरला म्हणजेच शनिवारी रात्री 12.30 वाजल्यापासून 4.30 वाजेपर्यंत तर दादर ते कुर्ला दरम्यान 1.10 ते 4.10 पर्यत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
हेही वाचा: CM Devendra Fadnavis on Amit Shah : संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची अमित शहांकडे मदतीची मागणी
मध्य रेल्वेवर मध्यरात्री घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम होणार आहे. तसेच रात्री 12.30 ते 1 दरम्यान जाणाऱ्या लोकलवरही मेगाब्लॉकचा परिणाम होणार आहे, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. भायखळा आणि शीव रेल्वे स्थानकावर गर्डर्स बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे हा रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. दिवसा चालणाऱ्या लोकलवर याचा परिणाम होऊ नये म्हणून हा ब्लॉक रात्री घेण्यात आला आहे.