नवी मुंबई : शहरात विना परमिट, विना परवाना, विना मीटर व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांची संख्या वाढली असून यामुळे अधिकृत रिक्षाचालकांवर अन्याय होत आहे. तसेच बेकायदा रिक्षाचालकांमुळे प्रवाशांची सुरक्षादेखील धोक्यात आली आहे. अशा रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी केली. शिष्टमंडळासमवेत नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेत याबाबत निवेदन दिले.