Tuesday, November 11, 2025 11:11:29 PM

Mumbai Metro 3: भूमिगत मेट्रो लाईन-3 वरील सर्व स्थानकांवर प्रवाशांना मिळणार 'ही' खास सुविधा

भूमिगत मेट्रो लाईन-3 वरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय कनेक्टिव्हिटी सुरू केली असल्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) सांगितले आहे.

mumbai metro 3 भूमिगत मेट्रो लाईन-3 वरील सर्व स्थानकांवर प्रवाशांना मिळणार ही खास सुविधा

मुंबई: भूमिगत मेट्रो लाईन-3 वर मोबाईल नेटवर्क नसल्याने प्रवाशांकडून वारंवार तक्रारी येत होत्या. यामुळे ई-तिकीट काढणे शक्य होत नव्हते. म्हणून, तिकिट बुकिंग सुलभ करण्यासाठी भूमिगत मेट्रो लाईन-3 वरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय कनेक्टिव्हिटी सुरू केली असल्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) सांगितले आहे. 

मोफत वाय-फाय सुविधेमुळे प्रवाशांची सोय वाढणार आहे. तसेच मेट्रो कनेक्ट 3 मोबाईल ॲपद्वारे डिजिटल तिकिट बुकिंग करता येणार आहे. सर्व अ‍ॅक्वा लाईन मेट्रो स्थानकांच्या कॉन्कोर्स (तिकीट) स्तरावर वाय-फाय सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रवाशांना सहज तिकिटे बुक करता येतील, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 

हेही वाचा: LPG Safety Drive In Mumbai : मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये एलपीजी सुरक्षा मोहीम सुरू; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाचा उपक्रम

प्रवाशांना स्टेशनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मेट्रो कनेक्ट 3 ॲप इन्स्टॉल करावे लागेल आणि लॉग इन करावे लागेल. भूमिगत कॉरिडॉरमध्ये प्रवास करताना प्रवाशांना भेडसावणाऱ्या सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक म्हणजे मोबाईल नेटवर्क नसणे. डिजिटल तिकिट सुविधा असून सुद्धा अनेकांना तिकिटे बुक करता आली नाहीत. 

वाय-फाय सेवा ही त्रासमुक्त तिकिट बुकिंग करण्यासाठी एक मोफत, सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय  आहे. त्यामुळे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने नागरिकांना या सुविधेचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचे आवाहन केले आहे. 


सम्बन्धित सामग्री