Friday, March 21, 2025 08:53:40 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील ‘त्या’ विधानावरुन वाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांवरील ‘त्या’ विधानावरुन वाद

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेबाबतचे वादग्रस्त विधान करून वाद निर्माण करणाऱ्या अभिनेते राहूल सोलापूरकर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या विधानानंतर आंबेडकरी जनतेनेही राहूल सोलापूरकर यांच्या निषेधार्थ आक्रमक भूमिका घेतली आहे. 

हेही वाचा: ठाकरे गटाचे 10-12 आमदार, खासदार शिंदेंचं नेतृत्व स्वीकारतील- उदय सामंत

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. ऑल इंडिया पँथर संघटनेचे दीपक केदार यांनी सोलापूरकरांची जीभ हासडून आणणाऱ्यांना बक्षीस जाहीर केलं आहे. आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि आता डॉ.आंबेडकरांवरील वादग्रस्त विधानाने शिवप्रेमी आणि आंबेडकरी जनतेनं राहूल यांच्या विरोधात आंदोलन पुकारलं आहे.  

या पार्श्वभूमीवर त्याच्या पुण्यातील निवासस्थानी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. इतिहासातील महापुरूषांवर वादग्रस्त विधानं करणाऱ्या सालोपूरकर यांच्याविरोधातील आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री