Sunday, April 20, 2025 04:53:55 AM

आरोपीचा पत्ता लागला, सलमान खान धमकीप्रकरणी मोठी अपडेट समोर

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याला पुन्हा एकदा जीवघेणी धमकी मिळाल्याने खळबळ उडाली होती. वरळी ट्रॅफिक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर अज्ञात व्यक्तीकडून एक मेसेज पाठवण्यात आला होता.

आरोपीचा पत्ता लागला सलमान खान धमकीप्रकरणी मोठी अपडेट समोर

मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याला पुन्हा एकदा जीवघेणी धमकी मिळाल्याने खळबळ उडाली होती. वरळी ट्रॅफिक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर अज्ञात व्यक्तीकडून एक मेसेज पाठवण्यात आला होता. या मेसेजमध्ये सलमानची गाडी बॉम्बने उडवून देण्याची आणि त्याला घरात घुसून ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकारामुळे सलमानच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. 

तपासादरम्यान पोलिसांनी ज्या नंबरवरून धमकीचा मेसेज आला होता, त्याचे नाव मयंक पांड्या हा गुजरातमधील वडोदरा जवळील एका गावात राहणार  26 वर्षीय तरुण असल्याचं शोधून काढलं आहे. वरळी पोलिसांनी त्याला चौकशीसाठी नोटीस पाठवली असून, पुढील 2-3 दिवसांत त्याला पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. या तरुणाने नेमकी ही धमकी का दिली, यामागे कोणाचा हात आहे का, हे तपासण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

हेही वाचा: 'गाडी बॉम्बनं उडवणार, घरात घुसून मारणार'; सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी

 धमकी देणारा तरुण मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं समोर आलं आहे. सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. वरळी पोलिस विभाग या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत असून, सलमान खानच्या सुरक्षेसंदर्भातही नवे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे सलमानच्या चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

 


सम्बन्धित सामग्री