मुंबई: प्रवाशांना आणि क्रिकेट चाहत्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेने रविवार, 2 नोव्हेंबर 2025 रोजी कुर्ला आणि वाशी दरम्यान हार्बर मार्गावर नियोजित मेगा ब्लॉक रद्द करण्याची घोषणा केली आहे. यामुळे आज महिला क्रिकेट विश्वचषक फायनल पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांना आनंद झाला आहे. महिला क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्याला जाणाऱ्या प्रेक्षकांना सुरळीत प्रवास करता यावा यासाठी नियमित देखभालीच्या कामासाठी नियोजित असलेला हा मेगााब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी घेतलेला निर्णय
मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले की, "सामना पाहण्यासाठी प्रवास करणाऱ्या क्रिकेटप्रेमींच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे दिवसभर हार्बर मार्गावर अखंडित रेल्वे सेवा उपलब्ध राहतील." हार्बर लाईनवरील सेवा नियमित वेळापत्रकानुसार धावतील, तर मुख्य लाईनवरील मेगा ब्लॉक वेळापत्रकानुसारच असेल.
हेही वाचा : Goregaon Mulund Link Road: मुंबईतील वाहतुकीला दिलासा; गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाचे बोगद्याचे काम निर्णायक टप्प्यात
प्रवाशांसाठी सल्ला
प्रवाशांना रेल्वेच्या वेळा आधीच तपासण्याचा आणि त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्याचा सल्ला मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिला आहे.