मुंबई : मुंबईत होणाऱ्या सत्याचा मोर्चामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यासपीठावर दाखल होत भाषणाला सुरूवात केली आहे. राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मतदार याद्यांमधील घोळाबाबत भाष्य केले. त्यांनी काही मतदार याद्यांची प्रत नागरिकांना दाखवतं मतदारांचे नाव, वय, पत्ता यांचे दाखले दिले. तसेच मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती केल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, असे आवाहनही सरकारला केले आहे.
हेही वाचा : Raj Thackeray In Mumbai Local : मनसेचा 'सत्याचा मोर्चा'!; राज ठाकरेंनी केला तिकीट काढून लोकलनं प्रवास
मनसेनं आयोजित केलेल्या या मोर्चात मविआसह राज्यातील इतर विरोधीपक्षातील नेतेही मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. शिवसेनेचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आदी मान्यवरांसह सुप्रीया सुळे, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात, भाई जगताप, जयंत पाटील, नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, अरविंद सावंत, शेकापचे नेते जयंत पाटील, अतिम ठाकरे, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई हेदेखील नेते व्यासपिठावर उपस्थित होते.
काय म्हणाले राज ठाकरे
आजचा मोर्चा राग, ताकद दाखविण्याचा मोर्चा आहे. दिल्लीपर्यंत समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे. देशातील अनेकांनी यावर भाष्य केले आहे. तोच विषय नव्याने सांगण्यासारखं काहीच नाही. या मोर्चाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार आहे. राज्यात दुबार मतदान आहेत. या विषयावर शेतकरी, कामगार, कम्युनिस्ट, काँग्रेसची लोकं बोलत आहे, भाजप आणि शिंदेंची लोकं बोलत आहे, अजित पवारचेही लोक बोलत आहेत,
मग अडवलं कुणी आहे?, निवडणूक घ्यायची घाई का आहे. आधी याद्या साफ करा, मग निवडणूक घ्या. सगळं लपून चाललं आहे. मी दोन-तीन गोष्टी दाखवायला आणल्या आहेत. भिवंडीमधील मतदाराने मुंबईच्या मलबार हिलच्या मतदारसंघात मतदान केलं आहे. मुंबईत लोकसभा मतदारसंघात १ जुलैला यादी बंद केली. मुंबई नॉर्थमध्ये 62 हजार दुबार मतदार आहे. वेस्टला 60 हजार दुबार मतदार आहेत. नॉर्थ सेंट्रल दुबार 62,740 हजार दुबार आहेत. तर साऊथ सेंट्रल 50565 दुबार मतरदार आहेत.