Tuesday, March 17, 2026 02:20:54 PM

BMC on Property Tax : मुंबईकरांसाठी मोठं गिफ्ट! आता मालमत्ता करात मिळणार मोठा दिलासा, करमाफीच्या प्रस्तावाला मंजूरी

700 चौरस फुटांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

bmc on property tax   मुंबईकरांसाठी मोठं गिफ्ट आता मालमत्ता करात मिळणार मोठा दिलासा करमाफीच्या प्रस्तावाला मंजूरी

मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती सत्तेत आल्यानंतर मुंबईकरांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आले आहेत.  मुंबईतील घरांसाठी मालमत्ताकर सवलतीची मर्यादा वाढवण्यात आली आहे. नव्या ठरावानुसार मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 500 चौरस फुटांवरून 700 चौरस फुटांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर सर्वानुमते मंजूर करण्यात आला. 

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईत सध्या राहणाऱ्या नागरिकांना आधी 500 चौरस फूटांपर्यंत कोणताही कर द्यावा लागत नव्हता. पण आता ही मर्यादा  700 स्क्वेअर फूटापर्यंत वाढवण्या आली आहे. मात्र नवीन मालमत्ताकर सवलतीमुळे पालिकेला सुमारे 700 कोटी रुपयांचा महसूल तोटा सहन करावा लागणार आहे.  मध्यमवर्गीय कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती पाहता, त्यांना 500 चौ. फुटांच्या सदनिकांचे मालमत्ता कर भरणे देखील परयडत नाही. शिवाय, त्यांना देखभाल व दुरुस्तीचा सार्च देखील गृहनिर्माण संस्थेला भरावा लागतो.

हेही वाचा -  India Canada Trade Deal: भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाला मिळणार बळ; कॅनडासोबत 2.6 अब्ज डॉलरचा 'युरेनियम' करार, वीज टंचाई मिटणार? 

मूळ मुंबईकर मुंबईतच राहावा आणि त्यांच्यावर मुंबई सोडण्याची वेळ येऊ नये म्हणून, मालमत्ता कर माफी असलेल्या 500 चौ. फुटांची मर्यादा वाढविणे हे नितांत गरजेचे आहे: ही वस्तुस्थिति लक्षात घेता, महानगरपालिकेचे असे ठाम मत आहे की, बृहन्मुंबई क्षेत्रातील 700 चौ. फुटापर्यंत निवासी सदनिकांचा मालमत्ता कर माफ करण्यात यावा, असे या ठरावात म्हटले आहे.

हेही वाचा -  Eknath Shinde Call : ठाण्यातील नागरिकही दुबईत अडकले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी फोनवरून साधला सवांद

सर्व कायदेशीर पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव महानगरपालिका आयुक्तांकडे सादर केला जाईल. आयुक्तांची सही झाल्यानंतर अधिकृत परिपत्रक काढण्यात येईल आणि 500 ते 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांसाठी मालमत्ता कर सवलत लागू होईल. या निर्णयामुळे मुंबईतील हजारो कुटुंबांना थेट आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 
 


सम्बन्धित सामग्री