Wednesday, July 09, 2025 09:22:52 PM

Mumbai Local: महिलांची लोकलमधील फ्रिस्टाईल हाणामारी व्हायरल

रेल्वेच्या डब्यातील महिलांची हाणामारी समोर आली आहे. महिलांच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या हाणामारीत एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

mumbai local महिलांची लोकलमधील फ्रिस्टाईल हाणामारी व्हायरल

मुंबई: आपण मुंबई लोकलमधील अनेक किस्से ऐकत असतो. मग ती मुंबई लोकलमधील गर्दी असो वा भजन करणारे लोक असो वा महिलांच्या लोकलमधील गप्पा असो सर्वच आपण बघत असतो. तसेच लोकलमधील महिलांची हाणामारी देखील पाहत असतो. आता तसाच प्रकार घडला आहे. रेल्वेच्या डब्यातील महिलांची हाणामारी समोर आली आहे. महिलांच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या हाणामारीत एक महिला गंभीर जखमी झाली आहे.  

आपण रेल्वे लोकलमध्ये महिलांचे भांडण आपण सातत्याने पाहत असतो. असाच प्रकार सध्या समोर आला आहे. चालत्या लोकलमध्ये बायकांची भांडण काही नवी नाहीत. मात्र आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये महिलांची जोरदार मारामारी समोर येत आहे. या हाणामारीत एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या हाणामारीचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.   

हेही वाचा: उत्तर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस; पावसामुळे भीमा नदीला पूर

रेल्वेतील अपघात, रेल्वेतील घटना, रेल्वेचे वेळापत्रक अशा अनेक चर्चातून आपली लाईफलाईन आपल्याला नियोजित ठिकाणी पोहोचवत असते. मात्र क्षमतेपेक्षा जास्त झालेल्या प्रवाशांना प्रवास करत असताना असंख्य अडचणींना सामना करावा लागतो असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. महिला डब्यामध्ये प्रचंड गर्दी असून दोन महिला एकमेकांशी भांडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या भांडणात एक महिलेला रक्तबंबाळ झाली आहे. त्यामुळे प्रशासन याकडे लक्ष देईल का तसेच सुखकारक प्रवास करण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करेल का हे आता पाहावे लागेल. सदर व्हिडिओ कुठला आहे याचा रेल्वे प्रवासी संघटनाही शोध घेत आहे. 
 


सम्बन्धित सामग्री