मुंबईची देवी म्हणून मुंबादेवीची ख्याती जगभर पसरलेली आहे. आग्री कोळ्यांची, मराठी माणसाची असणाऱ्या देवीच्या मंदिरपरिसरातील मराठीपण आता हरवत चालले असल्याची खंत आता मराठी माणसाला जाणवत असल्याचे समोर येत आहे. अशातच आता मुंबादेवी मंदिराच्या वातावरणावर मराठी अभिनेते यशोधन गडकरी यांनी व्हिडीओ शेअर केला आहे.
यशोधन कुलकर्णी यांनी मुंबादेवीच्याही मंदिरात मराठीपण कमी होत चालल्याचं चित्र दिसतंय असे म्हणाले. तसेच पुढे ते म्हणाले की, मुंबादेवी ही मुळची मराठी, आग्री आणि कोळी लोकांची देवी. इथे आल्यावर एक गोष्ट मला जाणवली, मुंबई सर्वांना सामावून घेते असं म्हणतात आणि मुंबादेवीच्या नावावरूनच मुंबई असं नाव पडलं."
हेही वाचा - Rakhi Sawant Video : राखी सावंतचा मोठा त्याग?; सलमान खानसाठी विकल्या दोन्ही किडन्या, कारणही सांगितले...
पुढे ते म्हणाले की, "कर्नाटकातील मंदिरांमध्ये गेल्यानंतर आपल्याला कर्नाटकमध्ये गेल्यासारखे वाटते, गुजरातमधल्या मंदिरात गेल्यानंतर गुजरातमध्ये गेल्याचा फिल येतो. वैष्णव देवीला गेलो की वैष्णवदेवीचा फिल येतो. तसंच युपी, बिहार इथल्या मंदिरांमध्ये गेलो की तिथे गेल्याचा फिल येतो, मात्र मुंबईतल्या मुंबादेवी मंदिरात गेल्यामध्ये देखील तुम्ही युपी बिहार किंवा वैष्णव देवीच्या मंदिरात आल्याचाच फिल येतो."
हेही वाचा - Raj Thackeray EVM Morcha : 'बॉसला मारा पण मोर्चाला या, दिल्लीला महाराष्ट्राचा राग दाखवण्याची हीच ती वेळ' : राज ठाकरे
नंतर ते म्हणाले की, "मंदिर परिसरात मराठीपण राहिलंय असं मला अजिबातच वाटत नाही. पूजा साहित्य विकणारी सगळे विक्रेते बऱ्यापैकी अमराठी दिसतायत. मराठी हाताच्या बोटावर मोजणारे असतील. पूजेच्या साहित्याचा जो प्रकार आहे तो सगळा वैष्णव देवी आणि युपी, बिहार वरच्या बाजूला असतो तसा आहे."
"आता आपण महाराष्ट्रात, मुंबईत आलो आहोत तर आपल्या पद्धतीच्या ओट्या आणि पूजा साहित्य दिसायला हवं असं माझं व्यक्तिगत मत आहे. असो शेवटी समरसता आहे ही येऊ घातलेली. मुंबई सर्वांना सामावून घेतेय पण हे सामावून घेत असताना मराठी माणूस कुठे आहे याचा प्रत्येकाने विचार करायचा. वाद घालण्यापेक्षा विचार केलेला जास्त बरा", असं ते शेवटी म्हणाले. त्यामुळे अमराठी लोकांनी देवी-देवतांवरदेखील कब्जा केला आहे का? असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे.