मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये असलेल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या भिंतीचा भाग कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, या इमारतीच्या बांधकामाच्या डागडुजीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
मुंबई विद्यापीठातील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये भिंतीचा भाग कोसळला आहे. यामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सुदैवाने कलिना कॅम्पसमधील अनर्थ टळला आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल राऊतांनी केला गौप्यस्फोट
विद्यापीठातील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या विविध विषयांवर युवासेनेचे सिनेट सदस्य गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. 2023 मध्ये याच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या छताची गळती होत असल्याचे आणि फ्लोरिंगच्या दुरावस्थेबाबत सतत पत्रव्यवहार करूनही विद्यापीठ प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप सिनेट सदस्यांनी केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दुखापत होवू शकते असेही तत्कालीन कुलगुरूंकडे पत्रव्यवहार केला होता, मात्र, विद्यापीठ प्रशासन त्याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप सिनेट सदस्यांनी केला आहे.
हेही वाचा : चंद्रशेखर बावनकुळे वादात: सोन्याचा मुकुट का झाला चर्चेचा विषय?
विद्यापीठात स्पर्धा सुरू असताना ही घटना घडल्याने ही घटना गंभीर आहे. प्रशासन जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहे. या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील काम कधी पूर्ण होणार? विद्यार्थ्यांना येथे योग्य सोयी-सुविधा कधी मिळणार? या अनुत्तरीत प्रश्नांना विद्यापीठ प्रशासनाने कृतीतून उत्तर देण्याची गरज आहे.