Sunday, February 16, 2025 10:15:47 AM

Sanjay Nirupam
संजय निरूपम यांच्या पोस्टनंतर राजकारण तापले

सैफ अली खान उपचारानंतर अवघ्या पाच दिवसात घरी परतला. सैफचे घरी परतणे संशयास्पद असल्याचा दावा शिवसेनेचे नेते संजय निरूपम यांनी केला आहे.

संजय निरूपम यांच्या पोस्टनंतर राजकारण तापले

मुंबई : सैफ अली खान उपचारानंतर अवघ्या पाच दिवसात घरी परतला. सैफचे घरी परतणे संशयास्पद असल्याचा दावा शिवसेनेचे नेते संजय निरूपम यांनी केला आहे. पाठिच्या मणक्या शेजारी शस्त्रक्रिया झाल्यानंतर पाचच दिवसांत सैफ इतका फिट कसा?, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

सैफ इतका फिट कसा? 
डॉक्टरांनी म्हटलं होतं की सैफ अली खानच्या पाठीत 2.5 इंच आतमध्ये चाकू घुसला होता. कदाचित तो चाकू आत अडकला असावा, सलग सहा तास शस्त्रक्रिया झाली. हे सर्व 16 जानेवारी रोजी घडलं. रुग्णालयातून बाहेर पडताच सैफ इतका फिट? तेसुद्धा फक्त पाच दिवसात? कमाल आहे असे संजय निरूपम यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

सैफच्या घरी परतण्यावरून हा एक चमत्कार असल्याचे संजय राऊत यांनीही म्हटलं आहे. त्यांचे उपरोधिक वक्तव्यं देखील संशय निर्माण करणारं 


घरात शिरलेल्या चोराने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या अभिनेता सैफ अली खानला मंगळवारी दुपारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. सैफवर दोन गंभीर शस्त्रक्रिया करण्यातत आल्या असून त्याची प्रकृती स्थिर असल्याने लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला घरी सोडण्याचा निर्णय घेतला असला तरी आता त्याभोवती राजकारण सुरू झालं आहे. काँग्रेसच्या विजय वडेट्टीवर यांनी निरूपम यांच्यावर उपरोधिक पलटवार केला आहे. 

हेही वाचा : मिलिंद देवरा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सैफ हल्ला प्रकरणात पोलिसांनी आरोपीसोबत स्टोरी रिक्रिएशन  केलंय. त्यात तो कसा आला, त्यानंतर तो कुठे आणि कसा गेला याचा सखोल तपाल पोलिस करत आहेत. मात्र यात आणखी एक ट्विस्ट आहे. आरोपीचे मिळालेले सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांनी अटक केलेला आरोपी यांच्या चेहऱ्यात साम्य नसल्याचे असंख्य पोस्ट नेटकऱ्यांनी म्हटले आहेत. त्यामुळे यासंपूर्ण प्रकरणात तपास पूर्ण होत नाही, तोवर आणखीन नवे ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. 


सम्बन्धित सामग्री