Monday, June 23, 2025 12:26:11 PM

कोल्ड्रिंकच्या ऍडने करिअरची सुरुवात... 2800 कोटींची मालकीण असूनही लपवलं खरं नाव; जाणून घ्या अभिनेत्रीची अचंबित करणारी लाईफस्टोरी

शिल्पा शेट्टी, खरी ओळख 'अश्विनी'. अभिनय, फिटनेस, व्यवसाय आणि कुटुंबात यश मिळवलेली प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व. नाव बदल हेच बनलं यशाचं गमक.

कोल्ड्रिंकच्या ऍडने करिअरची सुरुवात 2800 कोटींची मालकीण असूनही लपवलं खरं नाव जाणून घ्या अभिनेत्रीची अचंबित करणारी लाईफस्टोरी

What is Shilpa Shetty's real name: चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. तिचं आयुष्य, करियर आणि व्यक्तिमत्त्व आज लाखोंच्या प्रेरणास्थानी आहे. मात्र तुम्हाला माहितीय का की शिल्पा शेट्टी हे तिचं खरं नाव नाही? खरं नाव आहे ‘अश्विनी’.

8 जून 1975  रोजी कर्नाटकातील मँगलोरमध्ये जन्मलेल्या शिल्पाचा जीवनप्रवास सामान्य नव्हता. लहानपणापासूनच ती अभ्यासात आणि कलेत हुशार होती. शाळा संपल्यानंतर तिने मॉडेलिंगमध्ये पाऊल टाकले आणि तिच्या करिअरची खरी सुरुवात झाली एका लिम्का कोल्ड ड्रिंकच्या जाहिरातीतून.

शिल्पाने 1993 मध्ये 'बाजीगर' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच सिनेमात तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर ‘मैं खिलाडी तू अनाडी’, ‘धडकन’, ‘रिश्ते’, ‘फरेब’ अशा अनेक चित्रपटांतून तिने स्वतःची अभिनयाची छाप सोडली. पण अभिनयाव्यतिरिक्तही शिल्पा अनेक बाबतींत यशस्वी ठरली आहे.

ती केवळ एक अभिनेत्री नाही, तर एक यशस्वी उद्योजिकाही आहे. शिल्पाच्या नावावर आज फिटनेस अॅप, योगा डीव्हीडी, हेल्दी डाएटवर आधारित पुस्तक, कपड्यांचा ब्रँड आणि रेस्टॉरंट्सचा समावेश आहे. तिची अंदाजे संपत्ती सुमारे 2800 कोटी रुपये आहे, पण एवढं यश मिळवूनसुद्धा शिल्पाला गाडी चालवण्याची भीती वाटते! ती कधीच स्वतः गाडी चालवत नाही.

शिल्पाचं खरं नाव ‘अश्विनी’ होतं हे फार थोड्या लोकांना माहित आहे. तिची आई सुनीता शेट्टी यांनी तिच्या फिल्मी करिअरच्या सुरुवातीला एका ज्योतिषाचा सल्ला घेतला होता. ज्योतिषांनी सांगितलं की ‘शिल्पा’ हे नाव तिला अधिक यश देईल. आईने तो सल्ला मानून ‘अश्विनी’चं नाव बदलून ‘शिल्पा’ ठेवलं आणि आज ती नाव सर्वत्र गाजतं आहे.

आज 50 व्या वाढदिवशी शिल्पा केवळ यशस्वी अभिनेत्री म्हणून नव्हे, तर फिटनेस आयकॉन, उद्योजिका आणि आदर्श पत्नी-माता म्हणूनही ओळखली जाते. तिच्या नावात लपलेला हा यशाचा मंत्र खरंच प्रेरणादायी आहे.


सम्बन्धित सामग्री