पनवेल: पावसामुळे तळोजा सबवेमध्ये पावसाचे पाणी साचलं आहे. तळोजा फेज 1 रेल्वे सबवे पुन्हा जलमय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पावसाचं पाणी साचल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झालेली आहे. याआधी पावसामुळे तळोजा सबवे तब्बल 40 तास बंद होता.
आरएएफ सिग्नलकडून तळोजा फेज 1 कडे जाणाऱ्या रेल्वे सबवेमध्ये पुन्हा एकदा पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल 40 तास बंद असलेल्या या सबवेमुळे नागरिकांचे मोठे हाल झाले होते. त्यानंतर दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे रेल्वे प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे. सबवेमधील पाणी उपसण्यासाठी पाचपैकी केवळ तीनच पंप कार्यरत असून उर्वरित दोन पंप अद्याप नादुरुस्तच आहेत. या सगळ्या गोंधळामुळे नागरिकांना रेल्वे फाटकाचा पर्याय निवडावा लागत असून, 15 मिनिटांचा प्रवास करण्यासाठी चार ते पाच तास खर्च करावे लागत आहेत.
हेही वाचा: आमदार अब्दुल सत्तारांवर गंभीर आरोप
तळोजा फेज 1 रेल्वे सबवे पुन्हा जलमय
तळोजा फेज 1 कडे जाणाऱ्या रेल्वे सबवेमध्ये पुन्हा एकदा पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प आहे. गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल 40 तास बंद असलेल्या या सबवेमुळे नागरिकांचे मोठे हाल झाले होते. त्यानंतर दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे रेल्वे प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे. रेल्वे फाटक सतत बंद राहिल्याने नागरिक वैतागले आहेत. वाहतूक पोलीस नियोजनबद्धपणे वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र सबवे बंद असल्याने तणाव वाढला आहे. रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिक त्रस्त झाले असून, जर लवकरात लवकर उपाययोजना केल्या नाहीत तर रेल्वे रोको आंदोलन छेडू असा इशारा तळोजावासीयांनी दिला आहे. आज तळोजा वाहतूक शाखेने पुढाकार घेऊन पंप चालू करून सबवेमधील पाणी काढण्याचे काम हाती घेतले आहे.