Friday, March 21, 2025 09:04:47 AM

Holi 2025: ठाणे महापालिकेची सिंगल-यूज प्लास्टिकवर कारवाई, 2139 किलो प्लास्टिक जप्त

ठाणे महापालिकेने होळीच्या पार्श्वभूमीवर सिंगल-यूज प्लास्टिकविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि प्रभाग समितीच्या कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून ही मोहीम राब

holi 2025 ठाणे महापालिकेची सिंगल-यूज प्लास्टिकवर कारवाई 2139 किलो प्लास्टिक जप्त

ठाणे महापालिकेने होळीच्या पार्श्वभूमीवर सिंगल-यूज प्लास्टिकविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि प्रभाग समितीच्या कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून ही मोहीम राबवण्यात येत आहे, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली.
ठाणे महापालिकेने होळीच्या पार्शवभूमीवर सिंगल-यूज प्लास्टिकविरोधात मोठी कारवाई सुरु केली आहे. 

अवघ्या एका वर्षात 2139 किलो प्लास्टिक जप्त
महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्ष आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्यांनी एकत्र येत 1 एप्रिल 2024 ते 6 मार्च 2025 दरम्यान सिंगल-यूज प्लास्टिकवरील कारवाई मोहीम हाती घेतली. 4180 आस्थापनांची तपासणी केल्यानंतर 2139 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आणि रु. 13,56,600 दंड स्वरूपात वसूल करण्यात आले.

👉👉 हे देखील वाचा : Holi celebration guidelines: सुरक्षेसाठी पोलिसांची 'या' गोष्टींवर बंदी जाणून घ्या संपूर्ण आदेश

दरम्यान, बॉम्बे उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला प्लास्टिक फुलांवरील बंदीबाबत प्रश्न विचारला आहे.
ग्रोअर्स फ्लॉवर कौन्सिल ऑफ इंडिया (GFCI) या संस्थेने प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्याची मागणी करत याचिका दाखल केली होती. मात्र, केंद्र सरकारने प्लास्टिक फुले ही पुनर्वापरयोग्य किंवा जैवविघटनशील असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले. यावर न्यायालयाने केंद्राला थेट सवाल केला 'प्लास्टिक फुले पुनर्वापरयोग्य किंवा जैवविघटनशील असल्याचे केंद्र सरकारला नक्की माहीत आहे का?'

100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदीन्यायालयाने केंद्र सरकारच्या अधिसूचनेचा संदर्भ देत सांगितले की, पुनर्वापर न होणाऱ्या आणि जैवविघटनशील नसलेल्या सिंगल-यूज प्लास्टिकवर बंदी आहे. याच पार्श्वभूमीवर 30 मायक्रॉन जाडीची प्लास्टिक फुलेही या यादीत का नसावीत? असा सवाल न्यायालयाने केला.यावर याचिकाकर्त्यांना केंद्र सरकारच्या भूमिकेवर दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सध्या महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने सिंगल-यूज प्लास्टिकवर 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक उत्पादन, साठवण, वितरण आणि विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र, प्लास्टिक फुलांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
 


सम्बन्धित सामग्री