Monday, October 14, 2024 01:59:07 AM

Thane-Police-Arrest-Bangladeshi-Porn-Star
बांग्लादेशी घुसखोर बनली महाराष्ट्रात अश्लील अभिनेत्री

हिललाइन पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी एक मोठी कारवाई करत बांगलादेशी पॉर्न स्टार रिया बर्डे उर्फ आरोही बर्डे उर्फ बन्ना शेखला अटक केली आहे.

बांग्लादेशी घुसखोर बनली महाराष्ट्रात अश्लील अभिनेत्री

ठाणे :  जिल्ह्यातील हिललाइन पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी एक मोठी कारवाई करत बांगलादेशी पॉर्न स्टार रिया बर्डे उर्फ आरोही बर्डे उर्फ बन्ना शेखला अटक केली आहे. तपासाच्या सुरूवातीस तिच्या बनावट कागदपत्रांचा वापर करून भारतीय पासपोर्ट मिळवल्याचा खुलासा झाला. तीने प्रसिद्ध पॉर्न स्टार गेहना वशिष्टसोबत अनेक डोबे पॉर्न सीन्स शूट केले होते, ज्यामुळे तिचा कारनामा पोलिसांच्या लक्षात येण्यास कारणीभूत झाला.

तपास अधिकारी पीएसआय संग्राम माळकर यांच्या नेतृत्वाखालील टीमने आरोही बर्डेला ताब्यात घेतले. तपासादरम्यान, तिचे बनावट कागदपत्रांच्या आधारावर पासपोर्ट तयार करण्याचे काम उघडकीस आले. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, आरोहीची ओळख बांगलादेशी नागरिक म्हणून झालेली आहे. तिच्या अटकेमुळे या प्रकारातील गुंतलेल्या अन्य लोकांवर देखील कारवाई करण्याची शक्यता आहे. ही घटना उघड झाल्यानंतर पोलिस तपासाला वेग आला आहे, ज्यामुळे बांगलादेशी नागरिकांची माहिती आणि त्या संदर्भातील अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.


सम्बन्धित सामग्री




jaimaharashtranews-logo