Monday, February 10, 2025 06:21:33 PM

Mumbai
कोस्टल रोड-सी-लिंकला जोडणाऱ्या पुलाचं 'या' दिवशी होणार लोकार्पण

कोस्टल रोड-सी-लिंकला जोडणाऱ्या पुलांचं रविवारी 26 लोकार्पण होणार आहे.

कोस्टल रोड-सी-लिंकला जोडणाऱ्या पुलाचं या दिवशी होणार लोकार्पण

मुंबई : कोस्टल रोड-सी-लिंकला जोडणाऱ्या पुलांचं रविवारी 26 लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी मुंबई किनारी रस्ता आणि वरळी-वांद्रे सागरी सेतू यांना जोडणाऱ्या उत्तर वाहिनी पुलाचे लोकार्पण होणार आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

27 जानेवारीपासून दुतर्फा वाहतूक सुरू होणार आहे. लोकार्पणाच्या दुसऱ्या दिवशीपासून प्रवाशांसाठी हा मार्ग खुला होणार आहे. वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस् जंक्शन भागातील प्रवाशांसाठी तीन आंतरमार्गिका खुल्या होणार आहेत. कोस्टल रोड दररोज सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत राहणार खुला आहे. 

हेही वाचा : पश्चिम रेल्वेवर विशेष ‘जम्बो मेगाब्लॉक'

मुंबईच्या दक्षिण टोकापासून ते उत्तर मुंबईच्या टोकापर्यंत, म्हणजे नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी मुंबई किनारी रस्ता प्रकल्प टप्प्या-टप्प्याने बांधण्यात येत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यांतर्गत शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतचा धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची लांबी 10.58 किलोमीटर इतकी आहे. आजपर्यंत प्रकल्पाची 94 टक्के बांधणी पूर्ण झाली आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावरून दिनांक 12 मार्च 2024 ते 31 डिसेंबर 2024 अखेरपर्यंत 50 लाख वाहनांनी ये-जा केली आहे. तसेच या मार्गावरून दररोज सरासरी 18 ते 20 हजार वाहनांचा प्रवास सुरू असतो.


सम्बन्धित सामग्री