Monday, February 10, 2025 07:48:33 PM

Mumbai Municipal Corporation on 3 February
मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प ३ फेब्रुवारीला;६५ हजार कोटींच्या पार जाण्याची शक्यता!

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प तीन फेब्रुवारीला सादर होणार आहे.या अर्थसंकल्पात पर्यावरण, प्रदूषण, बेस्टसाठी ठोस उपाययोजना करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प ३ फेब्रुवारीला६५ हजार कोटींच्या पार जाण्याची शक्यता


आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचा (BMC) अर्थसंकल्प ३ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. यंदा आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी पहिल्यांदाच हा अर्थसंकल्प मांडणार आहेत. विशेष म्हणजे, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामान्य मुंबईकरांसाठी अनेक नवीन घोषणा होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील वाढते प्रदूषण आणि वाहतूक समस्यांवर मोठ्या उपाययोजना जाहीर होऊ शकतात. तसेच बेस्ट उपक्रमासाठी (BEST) भरीव आर्थिक तरतूद होण्याची शक्यता आहे. मुंबईची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नव्या बसेस, इलेक्ट्रिक वाहने आणि पर्यावरणपूरक उपायांची घोषणा केली जाऊ शकते.

"शरद पवारांना 10 जागा, अजित पवारांना 42? संशोधनाचा विषय!" - राज ठाकरे

या वर्षीच्या अर्थसंकल्पाचा आकडा ६५ हजार कोटींच्या पुढे जाणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांवर काही नवे कर लादले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता कर किंवा इतर शुल्क वाढवले जाऊ शकते.

हेही वाचा 👉🏻👉🏻मध्यमवर्गीयांना 2025-26 च्या केंद्रीय बजेटमध्ये करसवलतीची अपेक्षा

मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विकास प्रकल्प, आरोग्य, वाहतूक आणि स्वच्छतेसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३ फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी किती फायदेशीर ठरेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!

त्याचबरोबर, मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राउंडच्या १२४ एकर जागेचा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी उपयोग करण्याचा विचार आहे. मात्र, या जागेवरील कचऱ्याचे ढीग साफ करण्यासाठी सात ते आठ वर्षांचा कालावधी लागणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेला सुमारे अडीच हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.


सम्बन्धित सामग्री