Saturday, February 14, 2026 12:30:13 PM

Sion Flyover Parallel Bridge: ठाणे-CSMT प्रवास होणार सुस्साट! शीव उड्डाणपुलाला समांतर नवा पूल उभारणार; काय आहे सरकारचा मास्टरप्लॅन ?

150 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या या पुलामुळे ठाणे आणि पूर्व उपनगरांतून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना मोठा दिलासा मिळणार असून, प्रवासाचा वेळही वाचणार आहे.

sion flyover parallel bridge ठाणे-csmt प्रवास होणार सुस्साट शीव उड्डाणपुलाला समांतर नवा पूल उभारणार काय आहे सरकारचा मास्टरप्लॅन

Sion Flyover Parallel Bridge: मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्गावरील (Eastern Express Highway) शीव उड्डाणपुलावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आता तिथे एक समांतर उड्डाणपूल बांधला जाणार आहे. 150 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या या पुलामुळे ठाणे आणि पूर्व उपनगरांतून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना मोठा दिलासा मिळणार असून, प्रवासाचा वेळही वाचणार आहे.

व्हीजेटीआय (VJTI) कडून ग्रीन सिग्नल

शीव उड्डाणपुलाला समांतर पूल बांधणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे का, याचा अभ्यास करण्याची जबाबदारी 'व्हीजेटीआय' (VJTI) संस्थेकडे देण्यात आली होती. संस्थेने आपला सकारात्मक अहवाल सादर केला असून, हा प्रकल्प व्यवहार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अहवालामुळे आता प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा - Borivali Railway Station: 8K स्क्रीन, 381 मार्गांचं डिजिटल जाळं...बोरिवली स्थानकात देशातील सर्वात मोठी यंत्रणा सज्ज

प्रकल्पाचे नियोजन आणि स्वरूप 

सध्याच्या शीव उड्डाणपुलावर दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी केवळ एक मार्गिका (Lane) उपलब्ध आहे, ज्यामुळे तिथे मोठी कोंडी होते. नव्या पुलामुळे या दिशेला अतिरिक्त मार्गिका उपलब्ध होईल. महालक्ष्मी रेसकोर्स येथील पुलाच्या विस्ताराचे काम रद्द झाल्यामुळे, त्याच कंत्राटदाराकडे आता या नव्या शीव पुलाच्या उभारणीची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. आता केवळ वाहतूक पोलिसांच्या 'ना हरकत प्रमाणपत्राची' (NOC) प्रतीक्षा असून, त्यानंतर लवकरच प्रत्यक्ष कामाचे कार्यादेश दिले जातील.

प्रवाशांना होणारे फायदे 

वेळेची बचत: ठाण्याहून सीएसएमटीकडे जाताना शीव सर्कल आणि उड्डाणपुलावर अडकून पडावे लागणार नाही.
थेट कनेक्टिव्हिटी: पूर्व उपनगरांतून येणाऱ्या वाहनांना थेट आणि विनाअडथळा मार्ग उपलब्ध होईल.
इंधन बचत: वाहतूक कोंडीत वाया जाणारे इंधन आणि मानसिक मनस्ताप कमी होईल. 
 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या