४ ऑगस्ट, २०२४, मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे मुंबईला पाठीपुरवठा करणाऱ्या ७ पैकी ५ धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. मोडक सागर आणि उप्पर वैतरणा पूर्ण भरण्याची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईतील मध्य वैतरणा धरण भरलं आहे. मुंबई तलाव आणि सर्व धरणांमध्ये ८९. १ टक्के पाणीसाठा आहे.
शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस (Rain) पडल्याने धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली असून तालुक्यातील चारही धरणं तुडुंब झाली आहेत. सर्वात आधी तानसा धरण ओसंडून वाहू लागले, त्या पाठोपाठ मोडकसागर धरण आणि शनिवारी संध्याकाळी भातसा धरणही ओसंडून वाहू लागले. रात्री अडीच वाजता मध्य वैतरणा धरण देखील ओसांडून वाहू लागले. यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
दरम्यान, गेल्याच महिन्यात तुळशी, विहार, मोडक सागर, तानसा हे तलाव ओसंडून वाहू लागल्यानंतर त्यापाठोपाठ रविवारी मध्य वैतरणा तलाव देखील पूर्ण भरले आहे. यानुसार यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांपैकी ५ तलाव आतापर्यंत पूर्ण क्षमतेने भरले आहेत.