Saturday, February 08, 2025 02:12:08 PM

Will Mumbaikars get clean water?
मुंबईकरांना अखेर शुद्ध पाणी मिळणार? पाणीपुरवठ्यासाठी 300 कोटींची तरतूद!

मुंबईतील पाणीपुरवठा जलवाहिन्यांच्या विस्तृत जाळ्यावर अवलंबून आहे. मात्र, महापालिकेने तब्बल 300 कोटी रुपयांची दुरुस्ती आणि सुधारणा योजना हाती घेतली आहे.

मुंबईकरांना अखेर शुद्ध पाणी मिळणार  पाणीपुरवठ्यासाठी 300 कोटींची तरतूद

मुंबईतील पाणीपुरवठा जलवाहिन्यांच्या विस्तृत जाळ्यावर अवलंबून आहे. मात्र, या जलवाहिन्यांची दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी गळती, गळपाट आणि दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने तब्बल 300 कोटी रुपयांची दुरुस्ती आणि सुधारणा योजना हाती घेतली आहे.

मुंबईला पाणीपुरवठ्यातील मोठे आव्हान: 1342  दशलक्ष लीटर पाणी गळती आणि चोरीला!

मुंबईत दररोज मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होतो. मात्र, यातील तब्बल 1342 दशलक्ष लीटर पाणी गळती, चोरी आणि अन्य कारणांमुळे वाया जाते. ही संख्या मुंबईच्या एकूण पाणीपुरवठ्याच्या 34% एवढी मोठी आहे. पालिकेच्या प्रयत्नांमुळे हे प्रमाण पूर्वीच्या 38% वरून कमी झाले असले, तरी आणखी घट करण्यासाठी विशेष पावले उचलली जात आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

कोणत्या विभागाला किती निधी मिळणार?
मुंबईतील विविध भागांतील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी पुढीलप्रमाणे निधी मंजूर करण्यात आला आहे:

> एच पश्चिम (खार प.) – ₹12.10 कोटी
> एम पूर्व (गोवंडी) – ₹20.73 कोटी
> एन (घाटकोपर) – ₹23.96 कोटी
> एस (भांडूप प.) – ₹22.40 कोटी
> के पश्चिम (अंधेरी प.) – ₹21.34 कोटी
> आर उत्तर (दहिसर) – ₹10.28 कोटी
> पी दक्षिण (गोरेगाव प.) – ₹15.25 कोटी
> टी (मुलुंड प.) – ₹5.61कोटी
> एच पूर्व (सांताक्रूझ पू.) – ₹17,75 कोटी
> पी उत्तर (मालाड) – ₹17.85 कोटी
> आर दक्षिण (कांदिवली प.) – ₹12.58 कोटी
> आर मध्य (बोरिवली प.) – ₹9.25 कोटी
> के पूर्व (अंधेरी पू.) – ₹16.76 कोटी
> एल (कुर्ला) – ₹26.68 कोटी
> एच पू. व प. (खार/सांताक्रूझ) – ₹ 76.35 कोटी

हेही वाचा:  वक्फ विधेयक 'जेपीसी' अहवाल लोकसभेत सादर करणार

मुंबईकरांना खरंच शुद्ध पाणी मिळेल का? 
मुंबईत अनेक भागांमध्ये पाणीपुरवठ्याच्या समस्या वारंवार उद्भवत आहेत. महापालिकेच्या या नव्या योजनांमुळे पाण्याच्या गळतीवर नियंत्रण मिळवता येईल का आणि नागरिकांना अखेर शुद्ध आणि सुरळीत पाणीपुरवठा होईल का, हाच खरा प्रश्न आहे.

आगामी काळात या प्रकल्पांचे प्रत्यक्ष परिणाम कसे दिसतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


सम्बन्धित सामग्री