Fri. Aug 12th, 2022

मुंबईकरांचा प्रवास होणार ‘बेस्ट’

मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘चलो मोबाइल अँप्लिकेशन’ आणि ‘चलो बस कार्ड’ लॉन्च केले आहे. मुंबईत प्रवासासाठी मुंबई लोकलनंतर सर्वात सोयीची असणारी बेस्ट बस आता त्यांच्या ग्राहकांना अजून खास सुविधा देणार आहे. बेस्ट प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी खास ऍप लॉन्च करण्यात आले आहे.

बेस्टचे प्रवासी आता ऑनलाईन तिकीट बुकिंग करू शकणार आहेत. स्मार्ट कार्डच्या आणि ऍपच्या मदतीने ते बस पास काढू शकणार आहेत तो रिन्यू करू शकणार आहेत. चलो मोबाईल ऍप आणि चलो बस कार्ड यासाठी मुंबईकरांना मदत करणार आहेत.

ऑनलाईन तिकीट बुकिंग सोबतच ‘चलो ऍप’द्वारा केवळ बसचे लोकेशन प्रवाशांना समजणार असे नाही तर त्यासोबत ती बस तुमच्या जवळच्या बस स्टॉप वर येण्यासाठी किती वेळ लागणार? तसेच त्या बसमध्ये गर्दी आहे की नाही…याचीही माहिती प्रवशांना मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.