Tue. May 17th, 2022

मुंबईकरांची रखडपट्टी होणार

मुंबईकरांसाठी एक महतावाची बातमी आहे. ही बातमी बघुन मुंबईकर विक्रोळी पूर्व द्रुतगती पूलावर जायचं की ठरवतील. विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावर जेव्हीएलआर म्हणजेच जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड ज्या ठिकाणी सुरू होतो, त्या ठिकाणी असलेला पूल हा दुरुस्तीच्या कामासाठी १३ ते २४ मे या दहा दिवसात बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची रखडपट्टी होणार आहे.

ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या पूलच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून याचे दोनशे बेरिंग बदलायचे काम सुरू आहे. तर या पुलाचे एक्सपान्शन जॉइंट बदलण्यासाठी पूल बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस मुंबईवरून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना या पूलच्या खालील सिग्नल वर थांबावे लागेल. तसेच, यावेळी मुंबईत पूर्व – पश्चिम प्रवासात वाहतूक कोंडीची दाट शक्यता आहे.

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील महत्त्वाचा पूल दुरुस्तीसाठी बंद असल्याने नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. जोगेश्वरी मधील लिंक रोडला पूर्वेकडील जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड ला पश्चिम द्रुतगती महामार्गावर जोडणारा हा उड्डाणपूल आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी मिळून हा उड्डाणपूल बांधला आहे. या उड्डाणपूलाचे नुतनीकरण करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.