Fri. Jan 21st, 2022

ठाण्यामध्ये ‘मॅगी फेस्टिवल’, ‘मॅगी’च्या 50 हून अधिक वेगवेगळ्या डिशेस!

या फेस्टिव्हलमध्ये 50 हून अधिक मॅगीचे प्रकार चाखायला मिळणार आहे.

कधीही भूक लागली आणि घरात काही पदार्थ तयार केला नसेल, तर ‘मॅगी’ चा पर्याय हा हमखास असतो. पावसाळ्यात गरम मॅगी खायला लोकांची पसंती असते. हॉस्टेलवर राहणाऱ्या मुलामुलींचं मॅगीशी वेगळंच नातं असतं. ट्रिप, ट्रेकिंग करणाऱ्यांनाही मॅगी सोबत नेणं हा सोयीस्कर पर्याय वाटतो. ‘मॅगी’वर अनेकदा बंदी घालायचे प्रयत्न होऊनही या 2 मिनिट्स नूडल्सची लोकप्रियता काही कमी झाली नाही.  हे मॅगी पाण्यामध्ये उकळून 2 मिनिटांत तयार करायची सोपी पद्धत असली, तरी त्यात वेगवेगळे प्रयोगही केले जातात.  मात्र Maggie वापरून अनेक हटके पदार्थ तयार करण्याचा एक खास महोत्सवच मुंबईमध्ये होतोय.

मुंबईमध्ये मध्ये पहिल्यांदाच ‘मॅगी फेस्टीव्हल’चं आयोजन करण्यात आलंय. फक्त मॅगीच नाही तर मोमोज  फेस्टिव्हलचं देखील आयोजन करण्यात आलं आहे.

काय आहे मॅगी फेस्टिवल?

ठाण्याच्या कोरम मॉलमध्ये 12 ते 13 ऑक्टोबर रोजी Maggie Festival होत आहे.

दुपारी 4 ते रात्री 10.30 या वेळात हा खाद्यमहोत्सव आहे.

या फेस्टिव्हलमध्ये 50 पेक्षा जास्त मॅगीचे पदार्थ आपल्याला चाखायला मिळणार आहेत.

यामध्ये मसाला मॅगी, चिज मॅगी यांसारखी व्हरायटी तर असेलच. पण मॅगी पिझ्झा, मॅगी बिर्यानी यांसारखे नानाविध खाद्यपदार्थ खायला मिळतील.

त्यामुळे रोजच्याच मॅगीचा वापर करून किती वेगवेगळे खाद्यप्रकार बनू शकतात, याचीही आपल्याला कल्पना येईल.

मोमोजचाही आस्वाद लुटण्याची सोय

केवळ मॅगीच नव्हे, तर मोमोंचेही विविध प्रकार चाखायची सोय इथे आहे.

मॅगीचे 50 वेगवेगळे प्रकार या फेस्टिवलमध्ये आहेत, तसेच, मोमोजचे (Momo) सुद्धा 30 प्रकार चाखायला मिळणार आहे.

चिकन मोमोज, व्हेज मोमो यांसारख्या रेग्युलर प्रकारांबरोबरच चिली मोमोज, तंदुरी मोमोज अशी विविधताही तुम्हाला मिळेल.

फक्त फेस्टिवल नव्हे, तर स्पर्धासुद्धा!

केवळ महोत्सवात पदार्थ चाखून थांबू नका. जर तुम्ही खवय्ये असाल, आणि विशेषतः मॅगी किंवा मोमोप्रेमी असाल, तर येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेतही तुम्ही सहभागी होऊ शकतात.

1 मिनिटामध्ये जास्तीत मोमोज संपवायची स्पर्धाही या फेस्टिवलमध्ये आहे. तसंच 3 मिनिटांत जास्तीत जास्त मॅगी  खाण्याची स्पर्धादेखील ये महोत्सवात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *