Thu. Apr 18th, 2019

मुंबईचे डबेवाले सहा दिवसांच्या सुटीवर

27Shares

दररोज लाखो लोकांना डबे पोहोचवणारे मुंबईचे डब्बेवाले आता सहा दिवस सुटीवर आहेत.15 एप्रिलपासून हे डबेवाले आपापल्या गावाच्या यात्रेत सहभागी होणार असल्याने 15 ते 20 एप्रिल या कालावधीत ते रजेवर असणार आहे.मुंबईतील लाखो नोकरदार वर्ग या डबेवाल्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे सहा दिवस त्यांची गैरसोय होणार आहे.याबद्दल ‘मुंबई डबेवाला असोसिएशन’ने दिलगीरी व्यक्त केली आहे.

मुंबईचे डबेवाले सुटीवर

मुंबईतल्या लाखो लोकांचं जेवण पोहचवणारे डबेवाले १५ एप्रिलपासून सहा दिवसांच्या सुटीवर आहेत.

१५ ते २० एप्रिल या  सहा दिवसांच्या कालावधीत हे मुंबईतील सर्व डबेवाले  सुटीवर जाणार आहेत.

मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, अकोला, संगमनेर अशा भागातील हे डबेवाले मुंबईत डबे पोहचवण्याचे काम करतात.

हे डबेवाले आपापल्या गावांतील यात्रांमध्ये सहभागी होणार असल्याने ते रजेवर आहेत.

15 ते 20 एप्रिलपर्यंत डबे पोहोचवण्याच्या सेवेस सुट्टी असल्याचे ‘मुंबई डबेवाला असोसिएशन’ने स्पष्ट केलं आहे.

ग्राहकांनी या सुट्टीच्या कालावधीतील पगार कापू नये, अशी मागणीही मुंबई डबेवाला असोसिएशननं केली आहे.

22 एप्रिलपासून पुन्हा एकदा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होणार असल्याचेही सांगण्यात आलं आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *