Tue. Jun 28th, 2022

ड्रग्ज प्रकरणात ‘मुच्छड पानवाला’च्या करोडपती मालकाला अटक

मुंबई : अमली पदार्थ प्रकरणात मुंबईतील सुप्रसिद्ध ‘मुच्छड पानवाला’चे सहसंस्थापक रामकुमार तिवारी यांना अटक करण्यात आली आहे. चौकशीनंतर एनसीबीनं ही कारवाई केली आहे. मलबार हिल परिसरात ‘मुच्छड पानवाला’ याची प्रसिद्ध दुकान असून अनेक बॉलिवूड कलाकार, उद्योगपती व व्यावसायिकांचा पान खाण्यासाठी येतात. हे दुकान चालवणारे रामकुमार व जयशंकर दोघेही कोट्यधीश आहेत.

त्यापैकी रामकुमार याला एनसीबीच्या पथकानं अटक केली आहे. याशिवाय एनसीबीने शनिवारी खार व वांद्रे परिसरात छापे दोन दलाल बहिणींसह तिघांना ताब्यात घेतलं होतं. त्यात ब्रिटनमधील एका अनिवासी भारतीय नागरिकाचा समावेश असून त्यांच्याकडून २०० किलो ड्रग्ज देखील जप्त करण्यात आली आहे. या ब्रिटिश नागरिकाने लंडनहून मुंबईला अमली पदार्थ पुरवले होते. या तिघांच्या चौकशीतून मुच्छड पानवाल्याचं नाव समोर आलं आहे.

एनसीबीनुसार, ब्रिटिश नागरिक व या दोन्ही बहिणी उच्चवर्गीय असून हे तिघेही श्रीमतांना अमली पदार्थ पुरवत असल्याचं माहित झालं आहे. तसेच मुच्छड पानवाला हा देखील उच्चवर्गीयांना मालाचा पुरवठा करतो. त्याचे दुकान मुंबईतील उच्चवर्गीय श्रेणीत गणले जाते. याच पार्श्वभूमीवर तो या तिघांकडून अमली पदार्थ घेऊन त्यांचा पुरवठा श्रीमंत ग्राहकांना करीत असल्याचा संशय आहे. शिवाय या सगळ्याच्या आधारे एनसीबीनं रामकुमार तिवारी यांची चौकशी केली. त्यानंतर तिवारीला अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.