Wed. Dec 1st, 2021

#pulwama terror attack: शहिदांच्या कुटुंबीयांसाठी मुंबईकरांचा मदतीचा हात

जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशाचे 40 जवान शहीद झाले.

त्यामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली असून संपूर्ण देश शहिदांच्या कुटुंबीयांसाठी खंबीरपणे एकवटला आहे.

शहिदांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू झालेला असतानाच मुंबईत रोजंदारी कर्मचारी आणि असंघटीत कामगारांनी अवघ्या 10 मिनिटात 17.5 लाख रुपये जमा केले असून शहिदांच्या कुटुंबीयांना ही संपूर्ण रक्कम देण्यात येणार आहे.

ग्रँट रोडच्या द स्कूटर पार्टस असोसिएशनने शनिवारी शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते.

यावेळी श्रद्धांजली सभेच्या आयोजकांनी महाराष्ट्रातील दोन्ही शहिदांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

या आवाहनानंतर लोकांनीही तात्काळ खिशात हात घातले आणि शहिदांच्या कुटुंबीयांसाठी मदत केली.

बघता बघता अवघ्या 10 मिनिटातच 17.5 लाख रुपये जमा झाले.

एका भेलपुरी विक्रेत्यानेही त्याची दिवसाची कमाई 1,100 रुपये दान केले.

या शिवाय 3 हमालांनीही त्यांची एक दिवसाची कमाई दान केली, त्यामुळे 10 मिनिटांत 17.5 लाख रुपये जमा करण्यात यश आल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *