Thu. Jul 18th, 2019

मुंबईतल्या ‘या’ स्टेशनवर आता लोक चक्क जॉगिंगसाठीही येतात!

0Shares

मुंबईतली रेल्वे स्टेशन्स त्यातही हार्बर रेल्वेची स्थानकं म्हटली की ती घाणेरडी, कचऱ्याने भरलेली आणि जागोजागी थुंकण्याने रंगलेली असा एक सर्वसाधारण आपला समज असतो. मात्र हार्बर रेल्वेचं ‘किंग्ज सर्कल’ स्थानक मात्र याला अपवाद ठरलंय.

‘किंग्ज सर्कल’ स्टेशनचे स्टेशन मास्तर एन के सिन्हा यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हे स्थानक फक्त स्वच्छच बनलं नाही तर या स्थानकाने आपला चेहरा मोहराही बदललाय.

स्टेशनच्या बाजूला लागुन असलेली अवैध झोपडपट्टी उठवून त्याठिकाणी सुंदर बगीचा तयार करण्यात सिन्हा आणि त्यांच्या टीमला यश आलंय. आता हे ठिकाण इतकं सुंदर झालंय की स्टेशनवर संध्याकाळी लोकं या ठिकाणी इव्हिनिंग वॉक किंवा जॉगिंगसाठीही येतात.

स्टेशनाच्या सुशोभीकरणाच्या कामात त्यांना सेवाभावी संस्था आणि कॉलेजच्या विद्यार्थांची देखील मदत झाल्याची माहिती सिन्हा यांनी दिली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *