Tue. Dec 7th, 2021

मुबंई, पुणे या शहरांना दूध पुरवठा बंद, भासणार दूधाची कमतरता

कोल्हापूर आणि सांगली पुरात अडकल्याने पुणे, मुबंई शहरांना दूध पुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे. याचा फटका गोकुळ आणि कात्रज डेअरीमध्ये दूध संकलनाला बसला आहे. मात्र पुण्यात अजूनही कात्रज दूध ग्राहकांसाठी पुरविले जात आहे.

कोल्हापूर आणि सांगली पुरात अडकल्याने पुणे, मुबंई शहरांना दूध पुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे. याचा फटका गोकुळ आणि कात्रज डेअरीमध्ये दूध संकलनाला बसला आहे. मात्र पुण्यात अजूनही कात्रज दूध ग्राहकांसाठी पुरविले जात आहे. त्यामुळे उद्यापर्यत पुण्यात ग्राहकांसाठी दूध पुरविले जाणार आहे. कोल्हापूर आणि सांगलीत पूर परिस्थिती कायम राहिल्यास दुधाची कमतरता जाणवू लागणार आहे.

मुंबई, पुण्याला भासणार दूध टंचाई

पुण्यात गोकुळ,कात्रज अन्य डेअरींचा मिळून १४ लाख लिटरचा पुरवठा पुण्यात केला जातो. पावसामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पाणी साचले आहे. तसेच कोल्हापूर सांगलीमधून होणारी वाहतूक बंद आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यामधील दुध पुरवठा बंद झाला आहे. साधारण 2 दिवस पुरेल एवढे दुध शिल्लक आहे.

कोल्हापुर मधील तसेच ग्रामीण भागातील दुध संकलन देखील पावसामुळे थांबले आहे. जनावरांसाठी चाराही उपलब्ध नाही. याचा फटका दुध संकलनावर बसला आहे. त्यामुळे याचा परिणाम मुंबई पुण्याच्या दुध पुरवठ्यावर झाला आहे.

तारापूर मधील अमूलचा प्रकल्प एका महिन्यापासून बंद आहे. या प्रकल्पामध्ये शॉर्टसर्किट झाल्याने तिथून मुंबईपर्यंत पोहोचणारे तीन लाख लीटर दुध बंद झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांना दुध टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

वाहतुक बंद असल्याने दुधाचे टँकर पुढे जाऊ शकत नाहीत याच कारणास्तव वारणाने संकलन बंद केले आहे. त्यामुळे मुंबई आणि कोकणात पुरवठा कमी होत आहे. पुरामुळे चिपळूण, महाडला दूध पुरवठा शक्य होत नसून मंगळवारी रत्नागिरीलाही पुरवठा झाला नाही. कराडजवळ द्रुतगती मार्गावर पाणी आल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला तर यामुळे दूध वितरण होत नाहीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *