Fri. Jun 18th, 2021

मुंबईच्या प्रसिद्ध माउंट मेरी जत्रेला भाविकांची गर्दी

मुंबईतील सर्वांत प्रसिद्ध चर्चेसपैकी एक आहे बांद्रे येथील माउंट मेरी चर्च. सप्टेंबरमध्ये दरवर्षी येथे माउंट मेरीची जत्रा भरते. यावर्षीही 8 सप्टेंबर रोजी ही जत्रा सुरू झाली आहे. 15 सप्टेंबरपर्यंत ही जत्रा असेल. या जत्रेला सर्वधर्मियांची मोठी गर्दी असते.

माउंट मेरी जत्रेचं वैशिष्ट्य

माउंट मेरी हे देशातल्या सर्वांत सुंदर चर्चेसपैकी एक मानलं जातं.

16 व्या शतकात पोर्तुगालहून मदर मेरीची मूर्ती येथे आणली होती

तिच्यासाठीच हे भव्य चर्च टेकडीवर उभारण्यात आलं.

मात्र, इ.स. 1700 मध्ये अरबी चाच्यांनी या मूर्तीची नासधूस केली.

त्यानंतर अनेक वर्षांनी एका कोळ्याच्या स्वप्नात ही मूर्ती आली होती. समुद्रात ही मूर्ती मिळेल, असाही त्याला स्वप्नात दृष्टान्त झाला होता.

त्याला नंतर खरोखर ही मूर्ती समुद्रात आढळून आली.

त्यानंतर 1760 साली हे चर्च पुन्हा बांधण्यात आलं.

गेल्या 300 वर्षांपासून माउंट मेरी चर्च मुंबईमधील प्रसिद्ध चर्च म्हणून आपली ओळख जपतंय.

माउंट मेरी चर्च समुद्रपासून 80 मीटर उंचीवर आहे. या चर्चमधून अरबी समुद्राचं विहंगम दृश्य दिसतं.

8 सप्टेंबर नंतर येणाऱ्या रविवारी येथे आठवडाभर मोठी जत्रा साजरी केली जाते.

या जत्रेत वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाते.

लोक येथे मेणाचे अवयव दान करतात.

या जत्रेसाठी दररोज हजारो लोक गर्दी करतात.

यंदाही  8 सप्टेंबर ते  15 सप्टेंबर दरम्यान ही माउंट मेरीची जत्रा सुरू आहे. त्यामुळे यंदा या काळात लोकांसाठी जास्त बस सोडण्यात येणार आहेत. वाद्रें पश्चिम ते माउंट मेरी पर्यत 400 जास्त बस सोडण्यात येणार आहे. विशेषतः शेवटच्या दिवशी 15 सप्टेंबरला 94 अतिरिक्त जास्त बस सोडण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *