Wed. Oct 5th, 2022

महापालिकेतील आयुक्ताला लाच घेताना रंगेहात पकडले

महाराष्ट्रात भ्रष्टाचाराच्या अनेक घटना घडतात. दगम्यान नुकतीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील भष्टाचाराची घटना उघडकीस झाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील अधिकाऱ्यांची खाबूगिरी नविन वर्षातही सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या कार्यकारी अभियंत्याला आज 15 हजारांची लाच घेताना ठाणे अँटी करप्शनने रंगेहात पकडले आहे. बाळासाहेब जाधव असे या कार्यकारी अभियंत्याचे नाव असून महिला ठेकेदाराचे बिल काढण्यासाठी ही लाच घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत संबंधित ठेकेदाराने काम केले होते. त्याचे बिल काढण्यासाठी ही महिला ठेकेदार वारंवार या अभियंत्याच्या दालनात चकरा मारत होती. मात्र माझे पैसे दिल्याशिवाय बिलाची फाईल मंजूर करणार नाही अशी मागणी जाधवने केली.

त्यावर आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी आपल्याला पैशांची गरज असल्याची आर्त विनवणी करूनही या खादाड अभियंत्याने पैशाची मागणी लावून धरली. त्यामूळे या ठेकेदाराने अखेर ठाणे अँटी करप्शनकडे याबाबत तक्रार केली. त्यावरून अँटी करप्शनने जाधव यांना रंगेहात पकडले आहे.

दरम्यान दोनच दिवसांपूर्वीच आलेल्या कल्याण डोंबिवलीच्या नवीन आयुक्तांनी प्रशासनातील भ्रष्टाचाराची किड उपटून काढण्याचे सूतोवाच केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.