Tue. May 21st, 2019

धुळे, नगरमध्ये महापालिकेसाठी आज मतमोजणी

0Shares

अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून थोड्याच वेळात मतमोजणी चालू होणार आहे. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अहमदनगरमधील भवानीनगर येथील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ही मतमोजणी होणार आहे.

महापालिका निवणुकीत रविवारी धुळ्यात ६० टक्के तर नगरमध्ये ७० टक्के मतदान झाले. दुपारनंतर दोन्ही ठिकाणी मतदानासाठी उशिरापर्यंत मोठ्या रांगा लागल्या होत्या. धुळ्यात भाजपाकडून मोठ्या प्रमाणात पैसे वाटप झाल्याचा आरोप विविध पक्षांनी केला नगर व धुळ्यात त्रिशंकू स्थिती राहील, अशी शक्यता आहे.

महापालिका निवणुकीत रविवारी धुळ्यात ६० टक्के तर नगरमध्ये ७० टक्के मतदान झाले. दुपारनंतर दोन्ही ठिकाणी मतदानासाठी उशिरापर्यंत मोठ्या रांगा लागल्या होत्या. नगरमध्ये भाजपा आणि शिवसेना वेग-वेगळे लढत असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन ही निवडणूक लढवण्यात आली आहे. धुळ्यात गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री सुभाष भामरे आणि जयकुमार रावल या तिन्ही भाजपा नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लागली.

तर अहमदनगर पालिका निवडणुकीत भाजपा खासदार दिलीप गांधी आणि शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड याची प्रतिष्ठा पणाला लागली. काही तासांमध्येच धुळे आणि अहमदनगरधील चुरशीच्या लढतीनंतर राजकीय चित्र स्पष्ट होईल. या दोन्ही निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडेच सध्या सर्वांचं लक्ष लागून राहीलंय. धुळ्यात 59 टक्के मतदान झालं.

धुळे, नगरमध्ये महापालिकेसाठी आज मतदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *