Wed. Jun 29th, 2022

महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर

मुदत संपलेल्या महानगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश नगर विकास विभागाने दिले आहेत. त्यामुळे आता २२ महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडणार आहेत. त्यामुळे आता पालिका निवडणूका सप्टेंबरपर्यंत पुढे जातील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

२१ एप्रिल रोजी, ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी होणार आहे. त्यामुळे महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुका जून महिन्यात होण्याची शक्यता कमी आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह राज्यातील काही महापालिकांसाठी प्रारूप प्रभाग रचना आराखडा तयार करण्याचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने दिले होते. त्यानुसार महापालिकेने १७३ नगरसेवकांसाठी ५८ प्रभागांचा प्रारूप आराखडा केला होता. आता महापालिकेने नव्याने आराखडा केल्यास तो जाहीर करून त्यावर हरकती-सूचना मागवाव्या लागतील. त्यावर सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

त्यामुळे यात किमान दीड ते दोन महिन्याचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. तसेच निवडणुका आणखी पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.