महापालिकेच्या शाळेचा “शिक्षण आपल्या दारी” उपक्रम

औरंगाबाद : कोरोनाच्या जागतिक महामारीने जवळपास दोन वर्षांपासून प्रत्यक्ष शिक्षण बंद आहे.विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गोडी कमी होताना दिसते . कोविडच्या काळात बंद असलेली महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय अजून झाला नाही आहे .शासनाने जरी ऑनलीने शिक्षणाची सोय केली असली तरी जवळपास ७०% विद्यार्थ्यांपर्यंत पोचत नाही आहे . म्हणून औरंगाबाद महानगर पालिकेने शिक्षण आपल्या दारी हा उपक्रम सुरु केला आहे . ह्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिकण्यास आनंद मिळतोय त्यांच्या पालकांना सुद्धा आनंद मिळतोय .विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी पुन्हा निर्माण होताना दिसते आहे .औरंगाबाद महापालिकेच्या प्रियदर्शनी येथील शाळेने “शिक्षण आपल्या दारी” हा उपक्रम सुरू केला आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांना आता प्रत्यक्ष शिक्षणाचे धडे गिरवता येत आहेत.