Wed. Jun 23rd, 2021

MIM प्रवक्त्याला कोल्हापूर मनपा कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण

कोल्हापूर महानगरपालिकेच्या आवारात MIM चे पश्चिम महाराष्ट्राचे प्रवक्ते शाहीद शेख यांची धुलाई करण्यात आली. या हाणामारीमध्ये ते जखमी झाले आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

कशामुळे झाली हाणामारी?

शाहीद शेख हे पालिकेतील कर्मचाऱ्यांशी सतत उद्दामपणे बोलत.

एवढंच नव्हे, तर ‘तुम्हाला बघून घेईन’ अशा शब्दांत धमक्या देत अशी तक्रार कर्मचारी करत होते.

शेख यांच्या उद्दामपणामुळेच कर्मचाऱ्यांनी त्यांची धुलाई केल्याची माहिती मिळत आहे.

शुक्रवारी शाहीद शेख अतिरिक्त आयुक्तांना एक निवेदन द्यायला आले होते. निवेदन देऊन बाहेर पडत असताना महापालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांना उद्देशून शेख यांनी काही अनुद्गार काढल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे संतापलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेरत वाद सुरू केला. वाद विकोपाला गेल्यावर कर्मचाऱ्यांनी मिळून शेख यांना चोप दिला.

जखमी शेख सध्या रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *