Jaimaharashtra news

घाटकोपरमध्ये पित्यानेच केली गरोदर मुलीची ह’त्या!

घाटकोपरमध्ये रविवारी सकाळी विवाहित तरुणीची हत्या झाली.लालबहाद्दूर शास्त्री मार्गवर फुटपाथवर या महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. पोलिसांनी चौकशी केली असता त्या महिलेच्या पित्यानेच ही हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे.

घाटकोपरच्या नारायण नगर येथे लाल बहादूर शास्त्री मार्गावर काल सकाळी 7 वाजताच्या दरम्यान एक महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

नेमकं प्रकरण काय?

घाटकोपरच्या नारायण नगर येथे लाल बहादूर शास्त्री मार्गावर काल सकाळी 7 वाजताच्या दरम्यान एक महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

मिनाक्षी चौरसिया असे या 20 वर्षीय महिलेचे नाव असून तिच्या वडिलांनीच तीची हत्या केल्याची धक्कादायक महिती मिळाली आहे.

मीनाक्षी ठरलेले लग्न मोडून घरातून पळून गेली होती. तसेच तिने वडिलांच्या मर्जी विरोधात ब्रिजेश चौरसिया सोबत लग्न केले होते.

गावामध्ये आपल्या समाजात नाव खराब झाले याचा राग मनात धरून वडिलांनीच मुलीची हत्या केल्याचा प्रकार घडला आहे.

दूर्देव म्हणजे ज्यावेळी हत्या झाली तेव्हा मिनाक्षी चार महिन्यांची गरोदर होती.

Exit mobile version