…म्हणून पतीने केला पत्नीचा आणि मेहुण्याचा खून

महाराष्ट्रात आज सात जन्म हाच पती मिळावा यासाठी वटपौर्णिमा साजरी केली गेली. मात्र लातुर जिल्ह्यातील भातांगळी येथे सासरवाडीत आलेल्या नवऱ्यानेच  झोपेत असलेल्या पत्नीचा आणि मेहुण्याचा धारधार शस्त्राने खून केल्याची घटना घडली आहे. यानंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. वटपौर्णिमेदिवशीच अशी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

सुवर्णा विकास भोपळे ही मूळची भातांगळी येथील असून तिचा थेरगाव (ता. शिरुणांतपाळ) येथील विकास भोपळे याच्याशी विवाह झाला होता.
त्यांना एक मुलगा व एक मुलगी असून या दोघांमध्ये सातत्याने भांडण होत होते.
सतत बहिणीला मारहाण होत असल्याने युवराज निरुडे हा तिला माहेरी घेऊन आला होता. मागील 4 दिवसांपासून सुवर्णा ही माहेरी आली होती.
शनिवारी मध्यरात्री विकास भोपळे हा दुचाकीवरून आला व घराबाहेर झोपलेल्या पत्नीच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केला.
तर मेहुणा मारेल या भीतीने त्यालाही ठार केले. यामध्ये पत्नी सुवर्णा भोपळे व मेहुणा युवराज निरुडे यांचा जागीच मृत्यू झाला.
तर सासुच्या अंगावर वार केल्याने त्याही जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर विकास स्वतःहून लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
Exit mobile version